दिव्यांग बांधवांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन
दिव्यांगांना केले जाणार मोफत उच्च दर्जाचे कृतीम अवयव वितरीत; दिव्यांग बांधवांनी शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन

पुणे : ‘एक पाऊल प्रकाशाच्या वाटेने’ या संकल्पनेतून प्रहार आरोग्य कोठी क्लिनिक, पुणे व निशा इंटरप्राइजेज आणि फुप्रो इनोवेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग बांधवांनी शिबिरामध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रहार आरोग्य कोठी क्लिनिक, पुणे व निशा इंटरप्रायेजेज आणि फुप्रो इनोवेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १ फेब्रुवारी) मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ६० दिव्यांगांना उच्च दर्जाचे कृतीम अवयव वितरीत केले जाणार आहेत. यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून मुळ कागदपत्रे, शिधापत्रिका, आधार कार्ड, शासकीय रुग्णालयातील अपंगत्व बाबतचे तपासणी प्रमाणपत्र, स्वावलंबन कार्ड, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, डाव्या किंवा उजव्या पायाने अपंगत्व असल्याबाबतचा पूर्ण फोटो देणे गरजेचे आहे. प्रथम येणाऱ्यांना दिव्यांग बांधवांना प्राध्यान्य देण्यात येणार आहे.
शनिवारी (दि.१ फेब्रुवारी) सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शंकरशेठ रोड, सात लव्हज चौक जवळ, पौर्णिमा टॉवरजवळ, एकबोटे कॉलनी, घोरपडे पेठ, पुणे येथे संपन्न होणार आहे.
डॉ. हर्षवर्धन सामुद् (8764076575), डॉ. अभिषेक पाल (7039054451), नौशाद शेख (7020357263) यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेता येणार आहे.