वाघोली येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये विद्यार्थी परिषद प्रतिनिधी समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

वाघोली : वाघोली येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये विद्यार्थी परिषद प्रतिनिधी समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये नवीन विद्यार्थी प्रतिनिधींना संस्थेची मूल्ये आणि परंपरा जपण्याची जबाबदारीची सोपवण्यात आली.
वाघोली येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शनिवारी (१३ जुलै) विद्यार्थी परिषद प्रतिनिधी समारंभ आयोजित केला होता. हा कार्यक्रम ज्याने नवीन विद्यार्थी नेत्यांच्या नियुक्तीचा सन्मान पदचिन्हासह करण्यात आला. शाळेच्या समुदायामध्ये नेतृत्व आणि जबाबदारीची भावना प्रतिनिधी मध्ये प्रज्वलित केली.
कार्यक्रमाची सुरुवात सोनाली साळवे यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. यानिमित्त विद्यालयचे संस्थापक सुमेरचंद अगरवाल, संचालक रविकुमार अगरवाल, संचालिका कोमल अगरवाल व शाळेच्या मुख्याध्यापिका विनिता नंबियार आदी मान्यवर उपस्थित होते. संचालक रविकुमार अगरवाल यांनी नवनिर्वाचित प्रतिनिधींचे अभिनंदन करून विद्यार्थी नेत्यांच्या भूमिका व नेत्यांना दिलेल्या जबाबदाऱ्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी भाषण मधून मार्गदर्शन केले.
विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांची आणि त्यांच्या संबंधित भूमिकांची घोषणा हा या सोहळ्यातील महत्त्वाचा क्षण होता. इयत्ता १० वी ‘ब’ची रचना कदम हिची हेड गर्ल म्हणून तर १० ‘अ’चा आर्यन थोरात यांची हेड बॉय,१० वी ‘अ’चा मयूर जाधव स्कूल स्पोर्ट कॅप्टन आणि ९ वी ‘ब’चा चैतन्य इंगले स्कूल स्पोर्ट व्हाईस कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली.
याव्यतिरिक्त हाऊस कॅप्टन, हाऊस व्हाईस कॅप्टन, हाऊस स्पोर्ट्स कॅप्टन यांची नियुक्ती याप्रसंगी करण्यात आली.
१० वी ‘अ’ची सर्वेशा पाटील रेड हाऊस कॅप्टन, १० वी ‘ब’चा अंगद खांदवे ब्लू हाऊस कॅप्टन, १० वी ‘अ’ची श्रेया कडाळगे ही ग्रीन हाऊस कॅप्टन आणि १० वी ‘ब’ची माया चौधरी यांची यलो हाऊस कॅप्टन म्हणून निवड झाली. इयत्ता ९ वीची विद्यार्थिनी रुचिका शेंडे हिची रेड हाऊसचा उपकर्णधार, सानिका सतकुर ब्लू हाऊसची उपकर्णधार, रुद्रानी जोरे ग्रीन हाऊसची उपकर्णधार आणि स्नेहल बुद्धिवंत यलो हाऊसची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली. १० वी ‘अ’चा प्रशिक गोक्षे रेड हाऊस स्पोर्ट्स कॅप्टन, ९ वी ‘ब’चा अभिषेक पाटील ब्लू हाऊस स्पोर्ट्स कॅप्टन, १० वी ‘ब’चा श्लोक पडवल ग्रीन हाऊस स्पोर्ट्स कॅप्टन आणि १० वी ‘अ’चा अद्वैत थोरात याची यलो हाउस स्पोर्ट्स कॅप्टन म्हणून निवड करण्यात आली.
शपथविधिच्या समारंभात प्रतिनिधींना संस्थापक-अध्यक्ष सुमेरचंद अगरवाल, संचालक रविकुमार अगरवाल, संचालक कोमल अगरवाल, मुख्याध्यापिका विनिता नंबियार यांनी विद्यार्थी नेत्यांच्या गणवेशावर त्यांच्या नवीन जबाबदाऱ्या आणि त्यांच्यावर ठेवलेला विश्वास दर्शविणारे बोधचिन्ह लावले.