गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा वाघोलीत ९.१ टक्के कमी मतदान
२७७९८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; वाघोली ४६. १२ टक्के मतदान

वाघोली : शिरूर लोकसभा निवडणुकीत १३ मे रोजी वाघोलीमध्ये सरासरी ४६.१२ टक्के मतदान झाले असून गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा ९.१ टक्के मतदान वाघोली कमी झाले आहे.
शिरूर लोकसभा निवडणुकीत वाघोलीत एकूण ६० हजार ६९४ मतदारांपैकी २७ हजार २७९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. वाघोलीतील एकूण ५९ मतदान केंद्रावर निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडली. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण ३५ हजार ३३९ मतदारांपैकी १९ हजार ५१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता तर एकूण सरासरी ५५.२२ टक्के मतदान झाले होते. मागील निवडणुकीत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना १९ हजार ९४१ मते मिळाली होती तर महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना ६ हजार ५११ मते मिळाली होती. आढळराव पाटील यांनी ५४३० मतांची आघाडी मिळवली होती. यावेळेस वाघोलीतील दोन्ही उमेदवारांची तुल्यबळ लढत झाली आहे. वाघोलीतील दोन अपक्ष उमेदवार प्रकाश जमदाडे व विकास कसबे देखील उमेदवार आहेत. मतदानाची टक्केवारी अत्यंत कमी झाले असल्याने याचा फायदा नक्की कोणाला मिळणार येत्या ४ जूनच्या मत मोजणीनंतरच कळणार आहे.