माजी नगरसेवकाच्या खुनातील मारेकऱ्यास अटक
गुन्हे शाखा युनिट-६ ची कामगिरी; वाघोली येथून घेतले ताब्यात

वाघोली : जेजुरीचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांच्या खुनातील मारेकऱ्यास गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने वाघोली येथील गायरान परिसरातून अटक केली आहे.
दत्ता मारुती मळेकर (वय ४५ रा. गुरुवार पेठ, पुणे) असे अटक केलेल्या मारेकऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक महेबुब सय्यदलाल पानसरे यांचा जमीनीच्या वादातुन जेजुरी येथे निर्घृण खुन करण्यात आला होता. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-६ तपास करत असताना खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असलेला आरोपी वाघोली येथील गायरान परिसरात येणार असल्याची गोपनीय बातमी मिळाली. त्यानुसार युनिट-६ च्या पथकाने आरोपीचा गायरान परिसरात शोध घेवुन शिताफीने पकडले. त्याला ताब्यात घेवून तपास केला असता प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीने इतर साथीदारांसह गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला जेजुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शानाखाली गुन्हे शाखा युनिट-६ चे वरिष्ठ निरीक्षक रजनीश निर्मल पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पोहवा. मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंडे, संभाजी सपटे, प्रतीक लायगुडे, रमेश मेमाणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, अश्फाक मुलानी, ज्योती काळे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर यांनी केली आहे.