तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक
वाघोली : साखरपुडयाच्या कार्यक्रमात झालेल्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती. या गुन्ह्यात दीड महिन्यांपासून फरार असलेल्या एकाला गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने वाघोली येथील जेएसपीएम कॉलेज परिसरातून ताब्यात घेतले आहे.
आर्य अनुपसिंग ठाकुर (वय २०, वाघोली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वीच त्याचे साथीदार ऋषिकेश रमेश झेंडे (वय २३), अमन मुबारक शेख (वय २३), मनिष अनिल उबाळे (वय २०, तिघे रा. वाघोली) यांना अटक केले आहे. तर आर्य ठाकूर हा फरार होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी आर्य ठाकुर हा वाघोली येथील जेएसपीएम कॉलेज परिसरात थांबला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकास मिळाली. यावेळी सदर ठिकाणी जावुन ठाकुर याला ताब्यात घेण्यात आले. नमूद त्याच्याकडे चौकशी करून लोणीकंद पोलीस ठाणे येथे खात्री केली असता नमुद गुन्ह्यात पाहिजे आरोपीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांकडून चौकशी केली असता आरोपीने दीड महिन्यांपूर्वी साखरपुडयाच्या कार्यक्रमात झालेल्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यातील तिघांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे. आर्य ठाकूर याची वैदयकीय तपासणी करुन त्यास पुढील कायदेशीर कारवाईकामी लोणीकंद पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, गणेश डोंगरे, शेखर काटे, नितीन घाडगे, सुहास तांबेकर, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.