संगमवाडीत प्रचारादरम्यान भाजपा आमदारा समोरच प्रचंड राडा
कोयता, तलवारी, बंदुकीचा वापर; लाईट बंद करून सुमारे एक तास राडा
पुणे : भाजपचे शिवाजी नगर मतदार संघाचे उमेदवार आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारा दरम्यान संगमवाडी येथे गुरुवारी रात्री प्रचंड राडा झाल. यामध्ये कोयता, तलवारी, बंदुकीचा वापर करण्यात आला. लाईट बंद करून सुमारे एक तास राडा सुरू होता. भाजपा उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी तिकडून काढता पाय घेतला.भाजपा कार्यकर्ते समधान शिंदे आणि त्यांच्या मुलास जमावाने
मारहाण केली. याबाबत येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके म्हणाले, येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संगमवाडी गावामध्ये झालेल्या वाद विवादाबाबत संबंधित लोकांमध्ये गाव स्तरावर मीटिंग झालेली आहे असे समजते. अद्याप पर्यंत कोणीही तक्रार देण्यासाठी आलेले नाही. तक्रार प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांनी सांगीतले.