Video : उत्तर भारतीयांच्या अडचणी सोडविणार – सुरेंद्र पठारे
छटपुजेनिमित्त दिल्या शुभेच्छा
लोहगाव : लोहगाव भागात उत्तर भारतीय रहिवाशांची संख्या अधिक आहे. ते जरी उत्तर भारतीय असेल तरी गेली अनेक वर्षे महाराष्ट्र मध्ये रहात असल्याने महाराष्ट्र वाशीय झाले आहेत. त्यांना येणाऱ्या अडी अडचणी सोडविण्यासाठी कट्टीबद्ध असून त्यांनी भय मुक्त जीवन जगावे यासाठी आपण नेहमी त्यांच्या पाठीशी रहाणार असल्याचे युवा नेते सुरेंद्र बापुसाहेब पठारे सांगीतले. यावेळी त्यांनी छट पुजे निमित्त उत्तर भारतीय समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.
लोहगाव येथील हरणतले याठिकाणी उत्तर भारतीयांचा छटपुजा कार्यक्रमा झाला. यावेळी सूर्यास्त दर्शन तसेच सूर्य दर्शन घेण्यासाठी हरण तळ्यावर गर्दी झाली होती. कार्यक्रमाचे आयोजन छटपुजा सेवा ट्रस्टचे अध्यक्ष निरज राय, उपाध्यक्ष मृत्यूंजय कुमार, सचिव अशोक झा यासह पदाधिकारी तसेच उत्तर भारतीयांनी केले होते. लोहगाव मध्ये वृंदावण पार्क, गुरूद्वारा कॉलनी, रोहन अभिलाषा याठिकाणी छट पूजाचा कार्यक्रम झाला. याठिकाणी देखील पठारे यांनी जाऊन शुभेच्छा दिल्या. राजेंद्र खांदवे म्हणाले, छट पुजा कार्यक्रम आणखीन मोठ्यांनी करण्यासाठी आपणास कायमस्वरुपी जागा देण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार बापुसाहेब पठारे यांना विजयी करावे असे आवाहन केले. यावेळी सुनील खांदवे- मास्तर, राहुल गव्हाणे, सुनील (दादा) खांदवे पाटील, मोहनराव शिंदे, नेहा शिंदे, तनुजा शिंदे यासह मान्यवर उपस्थित होते.