वडगावशेरीत कोणत्या उमेदवाराला मिळाले कोणते चिन्ह
निवडणुक होणार रंगतदार; बाजी कोण मारणार टिंगरे की पठारे?
वडगावशेरी : वडगावशेरी मतदारसंघातून २४ उमेदवारांपैकी आठ जणांनी माघार घेतली असून १६ उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात आहेत. मात्र खरी लढत दोन राष्ट्रवादी मध्येच होणार असुन टिंगरे की पठारे बाजी मारणार याची चर्चा जोरदार रंगली आहे.
उमेदवारांना मिळालेले चिन्हे
१) हुलगेश चलवादी (बसपा) – चिन्ह हत्ती
२) बापूसाहेब तु. पठारे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) – चिन्ह – तुतारी वाजवणारा माणूस
३) सुनील विजय टिंगरे (राष्ट्रवादी काँगेस AP)- चिन्ह – घड्याळ
४) चंद्रकांत परमेश्वर सावंत – बहुजन समाज पार्टी आंबेडकर, चिन्हं – ट्रंपेट
५) विनोद कुमार ओझा (हिंदू समाज पार्टी)- चिन्ह- अंगठी
६) विवेक कृष्णा लोंढे (वंचित), चिन्ह- गॅस सिलेंडर
७) शेषनारायण भानुदास खेडकर (भारतीय जवान किसान पार्टी) चिन्ह – हिरा
८) सचिन दुर्वा कदम (विकास इंडिया पार्टी) चिन्ह – अटो रिक्षा
९) सतीश इंद्रजीत पांडे (राष्ट्रीय समाज पक्ष) चिन्ह – शिट्टी
१०) संजय लक्ष्मण पडवळ (भारतीय नवजवान सेना पक्ष) चिन्ह – डिश अँटिना
११) अनिल विठ्ठल धुमाळ (अपक्ष) चिन्ह – बॅट
१२) अभिमन्यू शिवाजी गवळी (अपक्ष) चिन्ह – पेनाची निब
१३) बापू बबन पठारे (अपक्ष) चिन्ह – ग्रामोफोन
१४) मधुकर मारुती गायकवाड (अपक्ष) चिन्ह – नागरीक
१५) राजेश मुकेश इंद्रेकर (अपक्ष) चिन्ह – गॅस शेगडी
१६) शशिकांत धोंडीबा राऊत (अपक्ष) चिन्ह – पाकीट
या मतदार संघात एकाच नावाचे दोन पठारे उमेदवार आहेत. मतदारात संभ्रम निर्माण करण्यासाठी ही खेळी केल्याची चर्चा आहे. १६ उमेदवार असल्याने दोन मशीन असणार असून मतदार मात्र सुज्ञ आहेत. उमेदवार, फोटो अन् चिन्ह बघूनच मतदान करतील अशी अपेक्षा आहे. एकंदरीत वडगांवशेरी मतदार संघातील निवडणूक रंगतदार होणार असून प्रचाराचा श्री गणेशा झाल्याने हळूहळू वातावरण तापायला देखील सुरुवात झाली आहे.