राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार पक्षात वाढतोय तरुणाईचा कल
बापूसाहेब पठारे यांच्या उपस्थितीत तरुणांचा पक्ष प्रवेश
वडगांवशेरी : वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या उपस्थितीत खराडी येथे तरुणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. शरद पवार यांच्या कार्यकर्तृत्वाने तसेच बापूसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाने व कामाने प्रेरित होऊन प्रवेश केले ते तरुणांनी सांगितले.
ऋतिक साठे, विशाल साठे, अक्षय खांदवे, शशांक खांदवे, समीर कोल्हापुरे,अक्षय साठे, ओम साठे, माऊली साठे, पांडुरंग साठे, उमेश साठे, चेतन साठे, ओम पवार यांनी यावेळी प्रवेश घेतला.
बापूसाहेब पठारे यांनी तरुण सहकाऱ्यांचे स्वागत करतेवेळी ते म्हणाले, तरुण वर्ग मोठ्याप्रमाणावर पक्षात येतोय. येणाऱ्या काळात लोहगाव, खराडी, चंदननगर, विमाननगर, धानोरी, विश्रांतवाडी व एकूणच वडगावशेरी मतदारसंघातील तरुणाईच्या रोजगार निर्मितीसाठी प्राधान्याने काम करायचे आहे. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल साठे, हनुमंत साठे, निलेश पवार, सचिन आबा खांदवे, मच्छिंद्र शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सुनील खांदवे-मास्तर यांचा पाठिंबा
महाविकास आघाडी मधून बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलेले लोहगाव येथील सुनील खांदवे- मास्तर यांनी अखेर बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा दिला. यावेळी जेष्ठ नेते प्रकाश म्हस्के उपस्थित होते.