आमदार अशोक पवार व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत रस्ते दुरुस्तीच्या कामांचा शुभारंभ

४ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद

पुणे  : केसनंद पीएमपीएमएल बस स्टँडच्या मागील बाजूस असणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण व इतर कामे तसेच केसनंद रोडवरील काळे ओढा ते केसनंद टीई कंपनी पर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. बस स्टँडच्या डांबरीकरणाचे काम पुणे महापालिका करणार आहे तर केसनंद रस्ता दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे.

वाघोली येथील केसनंद फाटा पीएमपीएमएल बस स्टँडचे काँक्रीटीकरण करण्याचे काम पीएमआरडीएच्या माध्यमातून नुकतेच पुर्ण झाले असले तरी बस स्टँडच्या मागील बाजूस असणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. रस्त्याचे काम करण्यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांनी मागणी सातत्याने केली होती. महापालिकेने याकामासाठी ५० लाखांची तरतूद केली होती. केसनंद रोडवरील काळे ओढा ते टीई कंपनीपर्यंत रस्ता दुरुस्ती करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात येणार आहे. यासाठी ४ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. दोन्ही कामांचा शुभारंभ आमदार अशोक पवार व स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांच्या उपस्थित सोमवारी (दि. ५ फेब्रुवारी) करण्यात आला आहे.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button