Video: पराभवाच्या भीतीपोटी श्रीगोंद्यातून बापू पठारे नावाच्या उमेदवाराची आयात – सुरेंद्र पठारे

पुणे : विरोधकांना त्यांच्या पराभवाचे संकेत दिसू लागल्लायाने श्रीगोंदा येथून बापू पठारे नावाचा उमेदवार शोधून आणला आणि त्यास उमेदवारी अर्ज भरावयास लावला आहे. मतदार सुज्ञ असून यामुळे काहीही फरक पडणार नसल्याचे पठारे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना सुरेंद पठारे यांनी निवडणूक आयोगाने “डमी” उमेदवार बापू पठारे यांचे प्रतिज्ञापत्र न दर्शवल्याचा आरोप देखील केला आहे. उमेदवारी अर्जात अनिवार्य आर्थिक अहवाल भरला नसल्याने निवडणूक आयोगाकडे आक्षेप घेतल्याचे देखील पठारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
वडगावशेरी मतदार संघात बापूसाहेब पठारे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) अधिकृत उमेदवार आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पठारे यांनी मतदार राजा सुज्ञ असून यामुळे परिस्थितीत काहीही फरक पडणार नसल्याचा विश्वास दर्शवला.
उमेदवारी अर्ज भरताना लोकांच्या मिळालेल्या कमी प्रतीसादामुळे निश्चित पराभवाची जाणीव झाल्यानेच विरोधकांनी शेवटच्या क्षणी हा घाट रचल्याचा आरोप पठारे यांनी केला.