मंगळवारी महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत दाखल करणार नामांकन अर्ज
वाघेश्वर मंदिर येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे समीर भाडळे यांचे आवाहन

वाघोली : शिरूर मतदार संघातून महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर (आबा) कटके वाघोली येथील वाघेश्वराचे दर्शन घेवून शक्ती प्रदर्शन करत मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांच्या उपस्थितीत नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. हजारोंच्या संख्येने महिला, पुरुषांनी सहभागी होऊन महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर (आबा) कटके यांना आशीर्वाद द्यावा असे आवाहन माजी उपसरपंच समीर (आबा) भाडळे यांनी केले आहे.
शिरूर-हवेली मतदार संघातून महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर (आबा) कटके शक्ती प्रदर्शन करत मंगळवारी (दि. २९ ऑक्टोबर) महायुतीचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वाघोली येथे वाघेश्वराचे दर्शन घेवून कटके शिरूरकडे रवाना होणार आहेत. परिवर्तन घडवण्यासाठी मंगळवारी वाघेश्वर मंदिर या ठिकाणी ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होऊन शिरूर-हवेलीच्या विकासाठी महिला, नागरिकांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संदीप (आप्पा) जाधव यांनी केले आहे.
शिरूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मार्केट कमिटी येथून भव्य रॅली निघणार असून पाच कंदील चौकामध्ये सभा होणार आहे. त्यानंतर महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर कटके नामांकन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
माउली कटके यांचा विजय निश्चित – संदीप (आप्पा) जाधव
शिरूर-हवेली महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर (आबा) कटके मंगळवारी (दि. २९ ऑक्टोबर) नामांकन अर्ज दाखल करत आहेत. कटके यांना समाजातील सर्व स्तरातून मोठे पाठबळ मिळत आहे. मतदारसंघात जनसामान्यांमधून भक्कम साथ मिळत असल्याने ज्ञानेश्वर (आबा) कटके यांचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया संदीप (आप्पा) जाधव यांनी दिली आहे.