पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त वाघेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

वाघोली : नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार अनेक वर्षांनंतर एकत्र आल्याने वाघोलीतील वाघेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी केली होती. प्राचीन आणि पांडवकालीन मंदिर असलेल्या वाघेश्वर मंदिरात दरवर्षी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भाविकांची मोठी गर्दी होत असते. भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी योग्य व्यवस्था तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी वाघोली विकास प्रतिष्ठाणच्या माध्यमातून याठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. मंदिरात येणाऱ्या भाविकांना फराळाचे वाटप देखील अन्नदात्यांकडून केले गेले. गेली अकरा वर्षांपासून जाधव वेअर हाऊसचे संचालक संतोष जाधव संदीप (आप्पा) जाधव यांच्या वतीने भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येते.