ग्रामसेवक तुकाराम पाटील यांची बदली
भरीव कामगिरीबद्दल पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने गौरव

वाघोली : आव्हाळवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची बदली झाली आहे. पाटील यांनी तीन वर्षांच्या कार्यकाळामध्ये केलेल्या भरीव कामगिरीबद्दल आव्हाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा गौरव करून निरोप देण्यात आला आहे.
आव्हाळवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तुकाराम पाटील यांनी सरपंच, उपसरपंच व सदस्यांना बरोबर घेऊन तीन वर्षांच्या कार्यकाळात अंदाजे १० कोटी रुपयांची विविध विकास कामे केली आहेत. गावातील मुलभूत प्रश्न मार्गी लावून आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांनी गावाच्या विकासाठी केलेल्या भरीव कामगिरीबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करून त्यांना निरोप देण्यात आला आहे. पाटील हे अन्य ठिकाणी सुद्धा त्यांच्या कामाचा ठसा उमटविल्या शिवाय राहणार नाहीत अशी भावना याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी हवेली पंचायत समितीचे उपसभापती नारायण आव्हाळे पाटील, महाराष्ट्र राज्य प्रदेश भाजप युवा मोर्चा कार्यकारणी सदस्य गणेश बापू कुटे, आव्हाळवाडी गावचे मा. उपसरपंच पिराजी आव्हाळे, मा. तंटामुक्त समिती उपाध्यक्ष पंकज आव्हाळे, हवेली तालुका राष्ट्रवादीचे वरीष्ठ उपाध्यक्ष अशोक सातव आदि उपस्थित होते.