केसनंद गावात कृषी संजीवनी कार्यक्रम संपन्न
खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी तज्ञांकडून सखोल मार्गदर्शन

वाघोली : मंडळ कृषी अधिकारी वाघोली यांच्या पुढाकाराने केसनंद येथे कृषी संजीवनी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञाबाबत कृषी तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागामार्फत २१ जून ते १ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी साप्ताह साजरा करण्यात येत आहे.
वाघोली मंडळ कृषी अधिकारी यांच्या पुढाकाराने कृषी संजीवनी मोहीम २०२१ कार्यक्रम केसनंद (ता. हवेली) ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाला.
शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञाद्वारे पिक उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने व खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाकडून कृषी संजीवनी कार्यक्रमामार्फत शेतकऱ्यांना कृषी तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये बीबीएफ तंत्रज्ञानासह कृषी विभागाच्या विविध योजनांबद्दल कृषी पर्यवेक्षक योगेश सूर्यवंशी यांनी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे नियोजन केसनंदच्या कृषी सहाय्यक अनुराधा टेकाळे व वाघोली कृषी मंडळ अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले होते. मंडळ कृषी अधिकारी जितेंद्र रणवरे व केसनंद गावच्या सरपंच रोहिणी सचिन जाधव यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिनेश झांबरे, सचिन जाधव, दत्तात्रय हरगुडे, धनंजय हरगुडे, नितीन गावडे, प्रकाश हरगुडे, केसनंद गावचे कृषी मित्र सतीश सावंत व शेतकरी उपस्थित होते.
कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी असे उपयुक्त कार्यक्रम वेळोवेळी राबवणे गरजेचे आहे. अशा उपयुक्त कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळेल व पिक उत्पन्न वाढवण्यासाठी मदत होईल. – रोहिणी जाधव (सरपंच, केसनंद)