Video : काँक्रीट मिक्सरची स्कूल बसला धडक

सुदैवाने दुर्घटना टळली; अपघातांचे सत्र काही थांबेना; परिवहन अधिकाऱ्यांचे लागेबांधे?

वाघोली वाघोली-लोहगाव रस्त्यावर काँक्रीट मिक्सरने स्कूल बसला जोरदार धडक दिली. बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ग्रीन रिपब्लिक सोसायटी समोर घटना घडली. बसमध्ये शाळकरी मुले होती. सुदैवाने मुलांना कुठलीही इज्जा पोहचली नसून मोठी दुर्घटना टळली आहे.

अपघातग्रस्त कॉंक्रिट मिक्सर

काही महिन्यांपासून अपघाताचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी (२४ सप्टेंबर) पुणे-नगर रोडवर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुणाच्या मृत्यूची घटना घडली असताना दुसऱ्याच दिवशी वाघोली-लोहगाव रस्त्यावर बुधवारी (दि.२५ सप्टेंबर) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ग्रीन रिपब्लिक सोसायटी समोर काँक्रीट मिक्सरने स्कूल बसला जोरदार धडक दिली. बसमध्ये विद्यार्थी होते. स्कूल बसच्या अपघाताची माहिती मिळताच पालकांमध्ये थरकाप उडाला. प्रशासन व लोकप्रतिनिधी याबाबत ठोस उपाययोजना करत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

परिवहन विभागाचे लागेबांधे? 

बहुतांश अवजड (डंपर) वाहने स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांची असल्याने व परिवहन आणि वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने बिनधास्त नियमांचे उल्लंघन करत डंपर चालकांची जीवघेणी स्पर्धा चालू आहे. परिवहन अधिकाऱ्यांचे डंपर मालकांशी लागेबांधे असल्याने दररोज असंख्य अवजड वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त मुरूम, दगडांची वाहतूक केली जाते. संबधित अधिकाऱ्यांकडून वाहनांवर थातूरमातूर कारवाई केली जात असल्याने सामान्यांमध्ये प्रचंड रोष असल्याचे दिसून येते.

डंपरमधून क्षमतेपेक्षा जास्त दगडांची होत असलेली वाहतूक

शाळा प्रशासनही जबादार :

स्कूल बस शाळेच्या बाहेर पडताना सुरक्षारक्षकाला रस्त्यावर थांबवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा प्रशासनाने देखील काळजी घेणे गरजेचे आहे. स्कूल बसचे चालक सुद्धा भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने जाणे, मध्येच अचानक घुसखोरी करणे आदी नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसून येतात. त्यामुळे पालकांनी स्कूल बस चालकांवर देखील नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

बेशिस्त व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येईल. – गजानन जाधव (सहा. पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, लोणीकंद)

पोलीस, महसूल आदी विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करायचा असेल तर सहज करता येतो. परंतु परिवहन विभागाचे अधिकारी दर दहा दिवसाला कार्यक्षेत्र बदलत असल्याने आणि कारभाराची सर्व धुरा एजंटकडे असल्याने सामान्यांना अधिकाऱ्यांशी संपर्क करणे जिकरीचे आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या या अजब कारभारामुळे जनसामान्यांमध्ये परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर शाशंकता निर्माण होत आहे. – राजेंद्र सातव पाटील (माजी उपसरपंच, वाघोली)

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button