देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या सराईताला अटक

लोणीकंद पोलीस तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी

पुणे : प्रतिनिधी  

देशी बनावतीचे पिस्टल बाळगणाऱ्या सराईताला लोणीकंद पोलीस तपास पथकाने वाघोलीतील बकोरी रोडवरील न्याती अॅलन साईट जवळील लेबर कॅम्प परिसरात अटक केली आहे.

विशाल ऊर्फ इशाप्पा जगन्नाथ पंदी (वय २१ वर्ष, जाधवराव बिल्डींग, बकोरी रोड, वाघोली) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार (दि. २८ फेब्रुवारी) रोजी लोणीकंद पोलीस तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोना स्वप्निल जाधव यांना पोलीस रेकॉर्डवरील सराईत बकोरी रोडवरील रामचंद्र कॉलेजवळ बकोरी रोडवरील न्याती अंलन या साइट येथील लेबर कॅम्प समोर उभा असून त्याचेजवळ पिस्टल असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार लोणीकंद पोलीस तपास पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याचेकडे ३४ हजार रुपये किंमतीचा देशी बनावटीचा पिस्टल व २ जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी सराईतास अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.    

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त रंजन शर्मा, पोलीस उपआयुक्त शशिकांत बोराटे, सहा. पोलीस आयुक्त किशोर जाधव, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकाटे, स्वप्निल जाधव, विनायक साळवे, कैलास साळुंके, अजित फरांदे, सागर जगताप, अमोल ढोणे, आशिष लोहार, मल्हारी सपुरे, सचिन चव्हाण यांनी केली आहे.

 
 
Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button