एन्जॉय ग्रुपच्या आठ जणांवर मोक्का कारवाई

लोणीकंद पोलिसांनी पाठविला होता प्रस्ताव

वाघोली : स्वारगेट येथे सन २०१३ साली कुणाल शंकर पोळ याचा खून करणाऱ्या आरोपीचा खून करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एन्जॉय ग्रुपच्या आठ आरोपींविरुध्द लोणीकंद पोलीस स्टेशनकडून पाठविण्यात आलेल्या मोक्का प्रस्तावास अपर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम २३(१) (अ) अन्वये मंजुरी दिल्याने मोक्का अंतर्गत आठ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

अमित म्हस्कु अवचरे ऊर्फ औचारे (वय २७ रा. पुणे), सुमित उत्तरेश्वर जाधव (वय २६ रा. गंजपेठ, पुणे), लतिकेश गौतम पोळ (वय २२ रा. कात्रज पुणे), शुमन ऊर्फ मॅटर अनिल जगताप (वय २७ रा. हडपसर, पुणे), ओंकार ऊर्फ भैय्या अशोक जाधव (वय २४ रा. भारती विद्यापीठ, पुणे), अजय ऊर्फ सागर बाळकृष्ण हेगडे (वय २७ रा. मेकराईनगर, पुणे), राज बसय्या ऊर्फ बसवराज स्वामी (वय २६ रा. भेकराईनगर, पुणे), रौफ बागवान (रा. हडपसर, पुणे) यांचेवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट ला विशाल सातपुते यांचे सहकारी असलेले राजू शेवाळे हे कोर्टाची तारीख असल्याकारणाने गेले असता विरोधी गट व त्यांच्या गटामध्ये तणाव निर्माण झाला होता. त्याच रात्री साडे अकराच्या सुमारास मांजरी-कोलवडी रोड येथे राजू शेवाळे यांचा घातपात करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी एन्जॉय ग्रुपच्या ८ जणांवर कारवाई करून अटक केली होती. त्यांच्याकडून ७ पिस्टल २३ जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली होती. वारंवार संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांनी पोलीस उप आयुक्त हिंमत जाधव यांचेमार्फत अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांना मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. मोक्का प्रस्तावास अपर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम २३(१) (अ) अन्वये मंजुरी दिली. त्यानुसार मोक्का अंतर्गत एन्जॉय ग्रुपच्या आठ आरोपींविरुध्द कारवाई करण्यात आली आहे. मोक्का अंतर्गत ही ३२ वी कारवाई आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, पोलीस अंमलदार सागर कडू, शुभम सातव, सुधीर शिवले यांनी केली आहे.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button