खराडीतील शरद पवारांच्या सभेत कोण प्रवेश करणार 

वडगांवशेरी मतदार संघात रंगली चर्चा 

वडगावशेरी: माजी आमदार बापुसाहेब पठारे यांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केल्यानंतर वडगावशेरी मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. येत्या २७ तारखेला खराडी येथे शरद पवार सभा घेणार आहेत. या सभेत १० माजी नगरसेवकांसह वेगवेगळ्या पक्षातील राजकीय पदाधिकारी प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कोण कोण प्रवेश करणार याची चर्चा आता पासून रंगू लागली आहे.

वडगावशेरी मतदार संघ महाविकास आघाडी मध्ये शिवसेना दावा करत असली तरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता आहे. तुतारी हातात कोण घेणार याची चर्चा होती, अखेर पठारे यांनी पक्षात प्रवेश केल्याने त्यांना तुतारी वाजवायला मिळन्याची शक्यता निर्माण झाली आहे. पठारे यांचा प्रवेश झाल्यानें भाजपचे माजी नगरसेवक अनिल ऊर्फ बॉबी टिंगरे हे भाजप मध्ये थांबले आहेत. तर माजी आमदार जगदीश मुळीक यांना वडगावशेरी ची जागा महायुती मध्ये भाजपला मिळणारं असा दावा करत आहेत. विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या विरोधात पठारे असल्याचे निश्चित झाले असले तरी तिरंगी लढत देखील होऊ शकते.

दरम्यान पठारे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशामुळे येत्या २७ तारखेला होणाऱ्या शरद पवार यांच्या मेळाव्यात त्यांनी १० माजी नगरसेवक आणि इतर पक्षातील पदाधिकारी प्रवेश करतील असा दावा केला आहे. पठारे यांच्या सोबत माजी नगरसेवक महेंद्र पठारे, भय्यासाहेब जाधव, महादेव पठारे यांनी प्रवेश केला आहे. २७ तारखेला माजी नगरसेवक किशोर विटकर, माजी नगरसेविका संजीला पठारे, सुमन पठारे, सुनीता गलांडे, मीनल सरवदे, माजी नगरसेवक हनीफ शेख, आयुब शेख, संदीप जऱ्हाड, नानासाहेब नलावडे, राजेंद्र खांदवे, सुभाष काळभोर, निलेश पवार यासह लोहगाव, वडगांवशिंदे, मांजरी मधील अन्य पदाधिकारी प्रवेश करतील अशी चर्चा रंगली आहे.

शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. आगामी विधानसभा निवडणूक आणि पुणे महानगपालिकेच्या निवडणुकीत याचे परिणाम दिसतील अशी चर्चा आहे.

बापुसाहेब पठारे म्हनाले, आमच्या कडे वेळ कमी आहे, मात्र २७ तारखेला जे कोणी प्रवेश करतील त्यांचे स्वागत आहे.

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button