बिरोबा मित्रमंडळाचा देखावा विधायक उपक्रम – चंदन सोंडेकर
वाघोली : शिरुर-हवेली मतदारसंघातील वाघोली येथे दिव्यांग संचलित बिरोबा मित्रमंडळाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेश प्रवक्ते चंदन सोंडेकर यांनी सोमवारी भेट दिली. सोंडेकर यांनी मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष धर्मेद्र सातव यांच्याकडून दिव्यांग बाधवांच्या समस्या जाणून घेऊन दिव्यांग बांधवांची सेवा करणार असल्याचे सांगीतले.
शिरूर-हवेली विधानसभा निवडणुकीचा कालावधी काही महिन्यांवर आला असून भावी आमदारांच्या भेटीगाठी मतदारसंघात सुरु झाल्या आहेत. चंदन सोंडेकर यांना वाघोलीतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चंदन सोंडेकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेश प्रवक्ते असून चळवळीतील कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे ही अजित पवार यांची भूमिका असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून (अजित पवार गट) इच्छुकांनी मतदारसंघात भेटीगाठी सुरु केल्या आहेत. सोंडेकर यांनी वाघोली येथे अनेकांच्या भेटीगाठी घेऊन वाघोलीवर सुद्धा लक्ष केंद्रित केले आहे.