अजित पवार गटाला जागा गेल्यास भाजप कार्यकर्त्यांकडून सहकार्य होणार नाही

बैठकीत पंकजा मुंढे यांना भाजप अध्यक्षांनी दिले पत्र

वडगावशेरी  : वडगावशेरी मतदार संघातील राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार सुनील टिंगरे यांनी लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराचे काम केले नसून उलट विरोधात काम केले आहे. त्यामुळे आगमी विधानसभा निवडणुकीत वडगावशेरीची जागा अजित पवार गटाला गेल्यास मतदार संघातील भाजप कार्यकर्त्याकडून त्या उमेदवारास कोणत्याही प्रकारचे सहकार्य होणार नाही असे पत्र भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे यांच्याकडे वडगावशेरी मतदार संघाचे भाजपा अध्यक्ष अर्जुन जगताप यांनी दिले आहे. याशिवाय माजी नगरसेवक अनिल टिंगरे यांनी देखील विद्यमान आमदार युती धर्म पाळत नसून महापालिकेच्या कामांचे श्रेय घेत असल्याचा आरोप मुंढे यांच्या समोर केला आहे. मुंढे यांच्या समोर महायुती मधील धुसफूस समोर आली आहे.

भारतीय जनता पार्टी वडगावशेरी मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी मुंढे यांनी सवांद साधला. त्यांच्या समोर अनेकांनी महायुती मधील खदखद बोलून दाखवली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी नगसेवक अनिल ऊर्फ बॉबी टिंगरे, योगेश मुळीक, राहुल भंडारे, मारुती सांगडे, मुक्ता जगताप, ऐश्वर्या जाधव, उपाध्यक्ष संतोष खांदवे, महेंद्र गलांडे, संदीप दहीफले, महेश गलांडे यासह मान्यवर उपस्थित होते.
याबाबत पंकजा मुंढे यांना पत्रकारांनी विचारले असता त्या म्हणाल्या, मतदार संघात भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद आहे. त्यामुळे सहाजिक हा मतदार संघ भाजपला जावा अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याने त्यांनी ती आपल्या समोर मांडली आहे. मात्र जागा वाटपाचा निर्णय वरीष्ठ घेतील असे त्यांनी सांगीतले.
भाजप मधील माजी आमदार, माजी नगरसेवक बैठकीला अनुपस्थितीत असल्याबाबत मुंढे यांना विचारणा केली असता पुढील बैठकीला ते उपस्थित राहतील असे उत्तर दिले. त्यानी नारायण राणे यांच्या बाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे टाळले.
मुंढे म्हणाल्या, विरोधकाकडून नरेटिव्ह प्रचार केला जात असून त्यास उत्तर म्हणून कार्यकर्त्यांनी स्थानीक पातळीवर लोकांशी संपर्क साधून विश्वास दिला पाहिजे. महायुतीने लाडकी योजना आणली असून महिलांमध्ये त्याबद्दल उत्साह आहे. यासह सर्व योजना कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहचविल्या पाहिजेत. बैठकीचे सुत्रसंचालन संतोष घोलप यांनी तर आभार संतोष राजगुरू यांनी मानले.

महायुती मधील संघर्ष वाढला

वडगावशेरी मतदार संघातील उदघाटन कार्यक्रमा वेळी देखील भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी आमदार टिंगरे हे युती धर्म पाळत नसल्याची टीका केली होती. आता तर टिंगरे यांना उमेदवारी दिल्यास भाजप कार्यकर्ते काम करणार नसल्याचे पत्र अध्यक्षांनी दिल्याने महायुती मधील संघर्ष वाढला असून आगामी काळात देखील पहायला मिळणार आहे.

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page