वाघोली येथे मोफत नर्सिंग असिस्टंट कोर्सचे आयोजन
अनिल सातव पाटील फाउंडेशन व आस्था फाउंडेशनच्या वतीने गरजूंसाठी स्तुत्य उपक्रम
वाघोली : दहावी, बारावी पास असणाऱ्या व ज्यांचे वय अठरा वर्ष पूर्ण आहे आणि ज्यांना नर्सिंग असिस्टंट कोर्स करायचा आहे त्यांच्यासाठी अनिल सातव पाटील फाउंडेशन व आस्था फाउंडेशनकडून मोफत स्कीममध्ये कोर्स करता येणार आहे. कोर्स पूर्ण झाल्यानंतर सर्वांना प्लेसमेंट मिळणार असल्याने नर्सिंग असिस्टंट कोर्स करण्यासाठी दिलेल्या नंबर वर संपर्क करून नोंदणी करावी असे आवाहन अनिल सातव पाटील फाउंडेशन व आस्था फाउंडेशन वतीने करण्यात आले आहे.
मोफत स्कीममध्ये नर्सिंग असिस्टंट (GDA) कोर्स उपलब्ध असून यामध्ये १२० दिवस क्लास व प्रक्टिकल असणार आहे. हा कोर्स पूर्ण मोफत असून कोर्सला आवश्यक असणारे साहित्य सुद्धा मोफत दिले जाणार आहे. कोर्ससाठी आधार कार्ड, दोन फोटो, दहावी, बारावी पास मार्कशीट व प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखल आदी कागदपत्रे देणे आवश्यक आहेत.
लायफ केअर हॉस्पिटल, यशोदा कॉम्प्लेक्स आव्हाळवाडी रोड, वाघोली आयोजन करण्यात आले आहे. कोर्स पूर्ण झाल्यानंतर सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कोर्स करणाऱ्यांना प्लेसमेंट देखील मिळणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या सुनिता सातव पाटील यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९०११८५००६९/८५३०१६४१६९