ऐन दुपारी निम्म्या लोहगावचा वीज पुरवठा खंडित

नागरीक उकाड्याने त्रस्त; वीज महावितरण विरोधात प्रचंड रोष

लोहगाव : निम्मा लोहगाव भागात भर दुपारी अडीच तास वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. उन्हाच्या पाराने ४० पार केलेली असताना वीज पुरवठा खंडित झाल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी महावितरणच्या कारभाराविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

लोहगाव ला वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या निर्माण होत आहे. लोहगाव-वाघोली रोड परीसर, कर्मभूमी नगर, काळभोर वस्ती, पवार वस्ती, माळवाडी वस्ती यासह वॉटर पार्क पर्यंतच्या परीसरात मंगळवारी (दि. ३० एप्रिल) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. दुपारी सव्वा चार वाजता  वीज पुरवठा सुरळीत झाला. ऐन उन्हाळ्यात वीज गायब होत असल्याने नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. पंधरा दिवसापूर्वी देखील वादळी वाऱ्याने काळभोर वस्ती परीसरात तांत्रिक बिघाड झाल्याने ४८ तास वीज पुरवठा गायब झाला होता. त्यांनतर वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने नागरीक संतापले आहेत.

पवार वस्ती परिसरात रहाणारे दिपक खांदवे म्हणाले, भर दुपारी दोन तासांहून अधिक काळ वीज गेल्याने नागरीक उखाड्याने हैराण झाले आहेत. वारंवार विज जात असल्याने महवितरणच्या कामाबद्दल नागरिकांमधून प्रचंड रोष आहे. विज बिलात वाढ झाल्याने विज बिले भरमसाठ वाढवून येत आहेत. मात्र विज समस्या वारंवार निर्माण होत आहे. महावितरणचा कारभार सुधारला नाही तर आंदोलन करण्यात येणारं आहे.

कनिष्ठ अभियंता गजानन झोपे म्हणाले, माळवाडी भागात तांत्रीक बिघाड झाल्याने काम करण्यासाठी विज पुरवठा खंडित केला होता. काम झाल्झायानंतर सुरळीत करण्यात आला.

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button