‘शिवस्वराज्य यात्रे’चे वाघोलीत उत्साहात स्वागत
अष्टापूर फाटा येथे सभा संपन्न

वाघोली : ‘शिवस्वराज्य यात्रे’चे शनिवारी (दि. १०) वाघोलीत उत्साहात स्वागत करण्यात आले. वाघोली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कमलाकर सातव पाटील, माजी सरपंच जयश्री सातव पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, माजी सरपंच वसुंधरा उबाळे, माजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब (गवळी) सातव पाटील, शिवसेना नेते राजेंद्र पायगुडे, किसान महाराज जाधव यांचेसह वाघोली परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हवेलीतील विविध गावांकडून शिव स्वराज्य यात्रेचे स्वागत झाल्यानंतर अष्टापूर फाटा येथे सभा पार पडली.
शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाने विधानसभेत आता हवापालट करण्याची वेळ आलीये. महायुतीच्या ढिसाळ कारभाराला वाचा फोडणारी ‘शिवस्वराज्य यात्रा’ निश्चितच परिवर्तन घडवून आणणार असल्याचा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.