लोणीकाळभोर येथे वाहनचोराला पकडले
गुन्हे शाखा युनिट-६ ची कारवाई
पुणे : गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने एका वाहन चोराला लोणीकाळभोर येथील कवडी फाटा टोल नाक्याजवळ पकडले असून त्याचेकडून दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
सागर बाबुराव वाघमारे (वय २७ रा तांदुळवाडी ता. माळशिरस, जि. सोलापुर) असे अटक करण्यात आलेल्या वाहनचोराचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट-६ चे पथक शुक्रवारी (९ ऑगस्ट) हद्दीत गस्तीवर असताना पोना नितीन मुंढे यांना एक इसम कवडीपाट टोलनाका लोणीकाळभोर येथे येणार असून त्याचेकडे चोरीची गाडी आहे अशी खात्रीशीर माहिती बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार सदर ठिकाणी पथकाने सापळा रचून एका इसमास दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याचेसह त्याचे ताब्यातील दुचाकीबाबत चौकशी करुन अभिलेख तपासले असता जेजुरी पोलीस ठाण्यात वाहनचोरीच्या गुन्ह्याची नोंद असल्याचे निष्पन झाले. त्याचेकडून गुन्ह्यातील एकूण ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी तपासकामी जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास जेजुरी पोलीस करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-२), सतीश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, शेखर काटे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, गणेश डोंगरे, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे, सुहास तांबेकर यांनी केली आहे.