सुनील खांदवे-मास्तर यांचा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेस  पक्षात प्रवेश

लोहगावलोहगावचे माजी उपसरपंच, महापालिका समावेश गावाचे शासन नियुक्त सदस्य  सुनील खांदवे-मास्तर यांनी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, जेष्ठ नेते प्रकाश म्हस्के, विधानसभा अध्यक्ष आशिष माने यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस  (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला.

खांदवे हे भारतीय जनता पार्टी मध्ये कार्यरत होते. मात्र विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक झाल्यापासून त्यांनी भाजप पक्षापासून फारकत घेतली होती. लोहगाव मधून राष्ट्रवादीत सर्व प्रथम मास्तर यांनी प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. सुनील खांदवे मास्तर म्हणाले, प्रदेश अध्यक्ष यांच्याशी चर्चा झालेनंतर पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. पक्ष जी जबाबदारी ती प्रामाणिकपणे पार पडणार असून पक्ष संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खांदवे मास्तर यांनी सांगितले.

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button