टिंगरेनगरमधून एक कोटीचे अंमली पदार्थ जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; तिघांना अटक

विश्रांतवाडीगेल्या काही महिन्यांपासून पुण्यात ड्रग्जचा साठा सापडण्याच्या घटना थांबता थांबत नाही. अंमली पदार्थांचे हब झालेल्या पुणे शहरात गुन्हे शाखेने लोहगाव येथून तब्बल १ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. या कारवाईत तिघांना अटक केली आहे.

श्रीनिवास संतोष गोदजे (वय २१, रा. धानोरी), रोहित शांताराम बेंडे (वय २१, रा. लोहगाव), निमिश सुभाष अबनावे (वय २७, रा. विघ्नहर्ता अपार्टमेंट, टिंगरेनगर, लोहगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टिंगरेनगर येथील विघ्नहर्ता अपार्टमेंट येथे तीनजण आले असून त्यांच्याकडे अंमली पदार्थ असल्याचा संशय असल्याची खात्रीशीर बातमी अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने तेथे जाऊन सापळा रचला असता संशयित तिघेजण रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे दिसले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ४७१ ग्रॅम मेफेड्रॉन (एम डी), ४ मोबाईल, दुचाकी, कार आणि दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा १ कोटी ८९ हजार ४६० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. पोलीस हवालदार संदिप दामोदर शिर्के यांच्या फिर्यादीवरून विश्रांतवाडी पालीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक उल्हास कदम करत आहेत.

विश्रांतवाडी मध्ये अवैध धंदे सुरूच 

विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस जरी अवैध धंदे बंद असल्याचे सांगत असले तरी अवैध धंदे जोमाने सुरूच आहेत. पोलीसांची हप्तेखोरी सुरूच आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीमनगर, फुलेनगर मध्ये सर्रासपणे गांजा, मध्य रात्री देशी- विदेशी दारू विक्रीसह मटका सुरू आहे. शांतीनगर,  राजीव गांधी नगर मध्ये मटका धंदा जोरात सुरू आहे. सर्व्हे नंबर १११ वडारवाडी मध्ये मटका धंदा सुरू आहे. वडार वस्ती, विश्रांतवाडी मध्ये एका महिलेचा गांजा विक्री व्यवसाय आहे. एका राजकिय पक्षाचा कार्यकर्ता व्हॉट्सअपवर मटका धंदा करतो, त्याचा हातभट्टी दारु विक्रीचा व्यवसाय आहे. एकता नगर मध्ये गांजा विक्री सुरू आहे. भैरव नगर मध्ये जकात नाका येथे मटका धंदा सुरू आहे. कळस मधील पठाणशाहा बाबा दर्गाच्या मागे पत्याचा क्लब दिवस रात्र सुरू आहे. पोलीसांनी हे अवैध धंदे कायमसवरुपी बंद करावेत अशी मागणी सर्व सामान्य नागरिक करत आहेत.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button