घरफोडी करणारी टोळी जेरबंद 

लोणीकंद पोलीस तपास पथकाची कामगिरी

वाघोली : रात्रीच्यावेळी घरफोडी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून २ घरफोडी व ४ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले असून साडे सहा लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

    सोनुसिंग जितेंद्रसिंग जुनी, सनीसिंग जितेंद्रसिंग जुनी, हंसराज ऊर्फ हंसु रणजितसिंग टाक (तिघेही रा. हडपसर) असे घरफोडी प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली येथील ज्वेलरी दुकानाचे लोखंडी शटर उचकटुन घरफोडी चोरी झाल्याने लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता. तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने सनीसिंग जुनी व हंसराज टाक यांना जेरबंद केले होते. तर सोनुसिंग जुनी यास लोणीकंद पोलिसांनी जेरबंद केले होते. तिघांकडे पोलीस कस्टडी दरम्यान केलेल्या कौशल्यपुर्ण तपासात त्यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनकडील घरफोडीचे दोन व वाहनचोरीचा एक तर येरवडा, देहूरोड व शिक्रापूर पोलीस स्टेशनकडील प्रत्येक एक वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आला. त्यांच्याकडून एक चारचाकी इको कार, ३ दुचाकी व ४० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड असा एकुण साडे सहा लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, तपास पथकाचे अधिकारी सपोनि रविंद्र गोडसे, पोलीस अंमलदार संदिप तिकोणे, विनायक साळवे, कैलास साळुंके, सागर जगताप, अजित फरांदे, स्वप्निल जाधव, अमोल ढोणे, साईनाथ रोकडे, शुभम चिनके, पांडुरंग माने, दिपक कोकरे, मल्हारी सपुरे यांनी केली आहे.

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button