सोमनाथ बनकर यांची उपायुक्तपदी वर्णी
पुणे : नगर रोड (वडगांवशेरी) क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक महापालिका आयुक्त सोमनाथ बनकर यांची उपायुक्त पदी वर्णी लागली आहे. त्यांच्याकडे पथारी अतिक्रमण विभाग, सुरक्षा विभागाचे उपायुक्त झाले आहेत. त्यांच्या जागी नगर रोड क्षेत्रिय कार्यालयात प्रभारी सहायक आयुक्त पदी संजय पोळ यांची नियुक्त करण्यात आली आहे.
परिमंडळ-१ च्या उपायुक्त किशोरी शिंदे यांचेकडे बदली भांडार विभाग व क्रीडा विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. तर परिमंडळ-१ च्या उपायुक्तपदी राजू नंदकर यांची वर्णी लागली आहे. नंदकर यांच्या अखत्यारित ढोले- पाटील क्षेत्रीय कार्यालय, येरवडा क्षेत्रीय कार्यालय तसेच नगर रोड क्षेत्रीय कार्यालय असणार आहेत. सुमारे १७ उपायुक्त यांच्याकडे नव्याने जबाबदारी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली असून आज (दि.७) पासून नव्याने आदेश निघालेल्या उपायुक्त यांच्याकडे कार्यभार सोपविण्यात येणार आहे.