Video वाघोली-केसनंद रोडची प्रचंड दुरावस्था
सा.बां. विभागाच्या अधिकाऱ्यांची नागरिकांनी अडवली गाडी; अधिकाऱ्यांसमोरच खड्डे बुजवून प्रशासनाचा केला निषेध

वाघोली : अतिवृष्टीमुळे वाघोली-केसनंद रोडची अतिशय दुरावस्था झाली आहे. संबधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांसह शासन नियुक्त नगरसेवक संदीप सातव व शांताराम कटके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची गाडी अडवून त्यांच्या समोरच स्वतः खड्डे बुजवून प्रशासनाचा निषेध नोंदवला.
वाघोली-केसनंद रस्त्यांची संततधार पावसामुळे मोठ्याप्रमाणावर चाळण झाली आहे. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करून देखील रस्ता दुरुस्तीसाठी दुर्लक्ष केले जात असल्याने सोमवारी (दि. २९ जुलै) शासन नियुक्त नगरसेवक संदीप सातव व शांताराम कटके यांचेसह संतप्त नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची गाडी अडवून त्यांच्या समोर खड्डे बुजवून प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला.
यावेळी पुणे मनपा शासन नियुक्त सदस्य संदिप सातव व शांताराम (बापू) कटके यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.