भरारी पथकाने कारवाई केलेल्या डंपरच्या बॅटऱ्यांची चोरी
डंपर मालकाने नुकसान भरपाईची केली मागणी
वाघोली : जिल्हा गौण खनिज भरारी पथकाने हायवा डंपरवर कारवाई केल्यानंतर पेरणे पोलीस चौकी येथे उभ्या असलेल्या डंपरच्या दोन बॅटऱ्या चोरून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी वाघोली-डोमखेलवस्ती येथील डंपर मालक आकाश सातव यांनी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी महसूल विभागाकडे केली आहे. याबाबत हवेलीचे उपविभागीय अधिकारी तसेच अप्पर तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
गौण खनिज भरारी पथकाने दंडात्मक कारवाई केल्यानंतर पेरणे पोलीस चौकी येथे डंपर हायवा उभा करण्यात आला. कारवाईचा दंड भरल्यानंतर डंपरच्या दोन बॅटऱ्या चोरीला गेल्याचे सातव यांच्या लक्षात आले. आधीच आर्थिक भुर्दंड सोसावा लागला असताना बॅटऱ्या चोरीला गेल्याने मोठे नुकसान झाले असून त्याची भरपाई देण्यात यावी अशी विनंती लेखी निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती आकाश सातव यांनी दिली.