Video : अल्पवयीन मुलास दारु दिल्या प्रकरणी येरवड्यातील वाईन शॉप केले ‘सील’

वाईन शॉप कायमस्वरूपी बंद करण्याची माजी नगरसेवक विटकर यांची मागणी

येरवडा : येरवडा येथील अल्पवयीन मुलाला दारूची विक्री करणारे एम. बी. आगरवाल वाईन शॉप उत्पादन शुल्क विभागाने ‘सील’ केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश येईपर्यंत दुकान बंदच राहणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक संतोष जगदाळे यांनी सांगितले. तर रहिवाशी भागात असलेले सदर वाईन शॉप कायम स्वरुपी बंद करण्याची मागणी माजी नगसेवक किशोर विटकर यानी केली आहे.

अल्पवयीन मुलाच्या वयाची खात्री न करता दारूची विक्री केल्यामुळे पोलिसांनी दुकानमालक राजेश महेंद्र आगरवाल (वय ४३, रा. येरवडा) आणि मॅनेजर मनोज चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली होती. सहायक पोलिस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे यांनी फिर्याद दिली आहे. न्यायलयाने आरोपींची जामिनावर मुक्तता केली आहे.

येरवडा येथे सोमवारी रात्री सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीने दारुच्या नशेत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास करताना अल्पवयीन मुलींना त्यांच्या अल्पवयीन मित्राने दारू आणून दिल्याचे उघडकीस आले.

अल्पवयीन मुलाला दारूची विक्री करताना दुकानदाराने वयाची खातरजमा केली नाही. त्यामुळे एम. बी. आगरवाल वाइन शॉप दुकान सील केले आहे.

आत्महत्या केलेल्या मुलीच्या वडिलांनी मुलीने आत्महत्या केली नसून तिच्या मैत्रीनिने आणि मित्रांनी हत्या केल्याचा आरोप केला आहे. पोलीसांनी सदर प्रकरण गांभीर्याने घेऊन मुलीच्या मित्र-मैत्रणीची चौकशी केल्यानंतरच खरे कारण बाहेर येईल. पोलीसांनी कसून चौकशी केली नाही तर आपण गृहमंत्री, पंतप्रधान यांच्या निवास स्थाना समोर आत्महत्या करणार असल्याचा इशारा देखील मृत मुलीच्या वडिलांनी दिला आहे.

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button