पालखी सोहळा उत्साहात साजरा
व्हीएसपी एज्युकेशन ट्रस्टच्या किड्सम प्री-प्रायमरी शाळेच्या वतीने करण्यात आले होते आयोजन

वाघोली : ‘अवघा रंग एकाची झाला, रंगी रंगला श्रीरंग’… महाराष्ट्राचे कृपाछत्र पंढरी निवासी विठ्ठल-रुखुमाई… देहू-आळंदी-पंढरीची आषाढी वारी हे अवघ्या महाराष्ट्रासाठी परिचित असणारा वैष्णवांचा चैतन्यमयसाधून वाघोली येथील सोहळ्याचे औचित्य व्हीएसपी एज्युकेशन ट्रस्टच्या किड्सम प्री-प्रायमरी शाळेमध्ये आषाढी वारी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी हातात भगवे झेंडे घेवून ‘जय राम कृष्ण हरी,’..विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल..अशा जयघोषाने शाळेचा परिसर भक्तीमय झाला होता. चिमुकल्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज, वारकरी अशा विविध संतांची हुबेहूब वेशभूषा केली होती. तसेच टाळ मृदुंग, पताका, तुळशी वृंदावन इत्यादी हातात घेऊन नटलेल्या बाल वारकऱ्यांनी पालखी सोहळ्याची रंगत वाढवली.
विद्यार्थींना खराखुरा पालखी सोहळा काय असतो तसेच पंढरीच्या वारीबद्दल माहिती व्हावी व हे अनुभवण्यासाठी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते असे शाळा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.