वाघोलीतील पायाभूत सुविधांसाठीचा ‘आराखडा’ तयार

भाजप नेते संदीप सातव यांची माहिती; पुणे मनपा आयुक्त यांच्या उपस्थितीत वाघोली ग्रामस्थांची बैठक संपन्न

पुणे :  वाघोली गावातील वाहतूक कोंडी, पाणी, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट आदी पायाभूत सुविधांबाबत पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार व मनपा अधिकारी यांच्या उपस्थितीत वाघोली ग्रामस्थ, भाजप पदाधिकारी यांची पुणे पालिकेमध्ये बैठक संपन्न झाली. मुलभूत सुविधांचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप सातव यांनी दिली.

वाघोली गाव पुणे महापालिकेत समाविष्ट होऊन दोन वर्षे उलटले परंतु रस्ता, पाणी, ड्रेनेज आदी मुलभूत सुविधा देण्यास महापालिका उपाययोजना करत नसल्याने नागरिकांना महापालिका कार्यालयासमोर जन आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. आंदोलनाची दखल घेत महापालिका प्रशासनाकडून गुरुवारी (दि. २७ जुलै) पुणे मनपा कार्यालयामध्ये वाघोली ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लोहगाव वाघोली भामा आसखेड प्रकल्पसाठी टेंडर प्रक्रिया केली असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याने वाघोली गावाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच रस्ते, पाणी, ड्रेनेज लाईन आदी मुलभूत सुविधा मार्गी लावण्यासाठी विकास आराखडा (DPR) तयार करण्यात आला आहे.

बाह्यवळण रस्ता झाल्यास बऱ्यापैकी वाघोलीचा वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल. बाह्यवळण रस्ता करण्यासाठी लवकरच पीएमआरडीए आयुक्त व पुणे महानगर पालिका आयुक्त यांच्या एकत्रित बैठकीचे आयोजन करण्यात येईल.

– मुरलीधर मोहोळ (माजी महापौर, पुणे मनपा)

वाघोली वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर असून याबाबत लवकरच माजी महापौर मुरलीधर मोहोळ वाघोली बाह्यवळण रस्ता करण्यासाठी पीएमआरडीए आयुक्त व पुणे महानगर पालिका आयुक्त यांची एकत्रित बैठक घेणार आहेत. त्याचबरोबर इतर समस्या सोडवण्याचे  देखील मोहोळ यांनी आश्वासन दिले आहे.

– संदीप सातव (भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस)

यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर (आण्णा) मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, भाजपा शहर अध्यक्ष धिरज घाटे, श्रीनाथ भीमाले, सुशील मेंगडे,राघवेंद्र मानकर, पूनित जोशी, तसेच पुणे शहर भाजपा पदाधिकारी यांचेसह वाघोली गावातील समस्या मांडण्यासाठी माजी उपसरपंच संदिप सातव, सदस्य जयप्रकाश सातव, सरचिटणीस विजय जाचक, टीम वाकोचे अमितकुमार मिश्रा, सदस्य व नागरिक उपस्थित होते.

Download in JPEG format

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page