वाघोली ग्रामपंचायतीच्या स्टोअर रूममधील डस्टबिन उंदरांनी कुरतडल्या
मनसेची जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे चौकशीची मागणी

वाघोली : वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने सुका व ओला कचरा टाकण्यासाठी वाटण्यात येणाऱ्या डस्टबिन ठेवण्यात आलेल्या ठिकाणी अस्तव्यस्त अवस्थेत पडल्या असून उंदरांनी कुरतडल्या आहेत. डस्टबिनबाबत चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
वाघोली (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना सुका व ओला कचरा टाकण्यासाठी डस्टबिनचे वाटप करण्यात येते. यावर्षी सुद्धा काही प्रमाणात नागरिकांना डस्टबिनचे वाटप करण्यात आले. परंतु पुर्णतः डस्टबिनचे वाटप झाले नाही. डस्टबिन ठेवण्यात आलेल्या स्टोअर रूममध्ये उंदराचा वावर वाढला आहे. अनेक डस्टबिन फुटल्या आहेत तर काही उंदरांनी कुरतडल्या असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तात्काळ डस्टबिनचे वाटप करण्यात यावे अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशा इशारा मनसेचे विधी विभागाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अॅड. गणेश म्हस्के, सहकार विभागाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय व्यवहारे, हवेली तालुकाध्यक्ष (जनहित) हितेश बोऱ्हाडे, सुनील विटकर, संकेत जाधवराव, प्रकाश जमधडे, मंगेश सातव, रोशन नवले यांनी दिला आहे. ग्रामविकास अधिकारी अनिल कुंभार यांनी डस्टबीनबाबत विचारले असता मी अजून बघितले नाही असे सांगितले.
अँ