जय मल्हार वि. का. सोसायटीच्या चेअरमनपदी स्वाती वारघडे
व्हा.चेअरमनपदी संजय शितकल
वाघोली : बकोरी (ता. हवेली) येथील जय मल्हार विविध कार्यकारी सोसायटी पहिल्या महिला चेअरमनपदी स्वाती भाऊसाहेब वारघडे यांची तर व्हा. चेअरमनपदी संजय शितकल निवड करण्यात आली.
संजय वारघडे आणि अलका वारघडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेची निवडणूक घेण्यात आली. चेअरमन आणि व्हा. चेअरमन पदासाठी एक-एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दोन्ही जागा बिनविरोध झाल्याची घोषित केले. निवडणूक अधिकारी म्हणून देसाई यांनी काम बघितले तर निवडणूक प्रक्रियेत संस्थेचे सचिव दहिफळे यांनी सहकार्य केले. दरम्यान संस्थेचे जेष्ठ संचालक विकास उंद्रे पाटील यांनी मार्गदर्शन केले. नवनिर्वाचित चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळाला ग्रामस्थांच्या वतीने ज्येष्ठ संचालक माजी उपसरपंच सुभाष (तात्या) वारघडे व प्रल्हाद वारघडे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बकोरीचे सरपंच सत्यवान गायकवाड, मा. उपसरपंच संतोष वारघडे, मा. उपसरपंच शांताराम वारघडे, मा. उपसरपंच म्हस्कु बहिरट, मा. उपसरपंच दत्तात्रय वारघडे, मा. चेअरमन बाळासाहेब वारघडे, मा. चेअरमन दत्तात्रय वारघडे, मा. चेअरमन संजय वारघडे, मा. व्हा. चेअरमन अलका वारघडे, पोलीस पाटील सीमा वारघडे, संचालक संतोष वारघडे, भाऊसाहेब वारघडे, संजय वारघडे, सागर वारघडे, रोहिदास शितकल, संतोष वारघडे, समीर वारघडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय व वसुली वाढविण्यासाठी योग्य प्रयत्न करणार असल्याची भावना नवनियुक्त चेअरमन स्वाती वारघडे व व्हा. चेअरमन संजय शितकल यांनी व्यक्त केली. भाऊसाहेब वारघडे यांनी आभार मानले.