नव्याने मंजूर झालेल्या रस्त्यांची लवकरच टेंडर प्रक्रिया
मनपा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माजी जि. प. सदस्य रामभाऊ दाभाडे शासननियुक्त नगरसेवक संदीप सातव, शांताराम कटके यांच्याकडून पाहणी

वाघोली : नव्याने मंजूर झालेल्या रस्त्यांची नुकतीच माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे संदीप सातव शांताराम कटके यांनी मनपा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी केली. लवकर तांत्रिक मान्यता होऊन टेंडर प्रक्रिया करून रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती शासननियुक्त नगरसेवक संदीप सातव यांनी दिली.
केसनंद रोड ते हिलशयर सोसायटी रस्ता विकसित करणे (४० लक्ष), वाघेश्वर चौक ते बाईफ रोडसाठी सर्विस रास्ता बनविणे (८० लक्ष), वाघोली पीएमपीएमएल (PMPML) बस स्थानका मागील रस्ता विकसित करणे (५० लक्ष), बायफ रोड ते कांचणपुरम सोसायटी ते फकिर बाबा वाडा रस्ता विकसित करणे (३० लक्ष), म्हसोबा मंदिर ते प्राइमरोज सोसायटी रस्ता विकसित करणे (३० लक्ष) आदी कामे नव्याने मंजुर करण्यात आली आहेत. मंजूर करण्यात आलेल्या रस्त्यांची पाहणी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, पुणे महानगरपालिका शासन नियुक्त समिती सदस्य शांताराम (बापू) कटके, संदीप (आबा) सातव, मा. उपसरपंच महेंद्र भाडळे, विजय जाचक, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी देवडे, सुनील पोपळे यांच्या उपस्थित पाहणी केली. लवकर तांत्रिक मान्यता होऊन टेंडर प्रक्रिया करून रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती पुणे मनपा शासननियुक्त सदस्य तथा भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांनी दिली.