विश्रांतवाडी पोलिसांच्या सतर्कते मुळे वाचले जेष्ठ महिलेचे प्राण
घरात चक्कर येऊन पडलेल्या महिलेची केली मदत

विश्रांतवाडी : विश्रांतवाडी पोलिसांनी एकटी रहाणाऱ्या ज्येष्ठ महिलेला तत्परतेने मदत केल्याने तिचे प्राण वाचण्यास यश आले आहे. पोलिसांनी बजावलेल्या या कामगिरी मुळे त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
विश्रांतवाडी मधील टिंगरे नगर लेन नंबर 13, मोरया रेसिडेन्सी या ठिकाणी एक महिला घरांमध्ये असल्याबाबत व घर उघडत नसल्याबाबत पोलीस नियत्रंण कक्षास माहिती मिळाली. तातडीने विश्रांतवाडी पोलिस ठाण्याकडील आळंदी रोड मार्शल व धानोरी मार्शल सदर ठिकाणी गेले असता पोलीस हवालदार वामन सावंत यांनी खिडकीतून पाहिले असता सदर महिला डोक्यावरती घरामध्ये पडली होती, तिला उठता येत नसल्याचे त्यांना दिसले. दरवाजा आतून उघडला जात नसल्याने कर्तव्यावर असणाऱ्या सर्व पोलिसांनी मिळून घराचे सेफ्टी डोअर व मेन डोअर तोडून घरात प्रवेश केला. जखमी ज्येष्ठ महिला नलिनी विजय जाधव (वय 70 वर्ष) यांना उचलून उपचारासाठी तातडीने जहांगीर हॉस्पिटल या ठिकाणी पाठवले. वेळेत त्यांना रुग्णालयात दाखल केल्याने जाधव यांची मुलगी बेंगलोर येथे असते तर भाऊ पुण्यात रास्ता पेठ मध्ये रहातात.
सदरची कामगिरी महिला पोलीस उपनिरीक्षक सुधा चौधरी, पोलीस हवालदार बालाजी वनवे, पोलीस हवालदार वामन सावंत, पोलिस हवालदार रामदास कोळप यांनी केली. पोलिसांनी तत्परता दाखवून घरी एकटी असणाऱ्या जेष्ठ महिलेचे प्राण वाचविण्यात यश आल्याने विश्रांतवाडी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.