भरधाव कारने एकास चिरडले
एक जण गंभीर; विश्रांतवाडी-आळंदी रोडवरील घटना

पुणे : भरधाव वेगाने येणाऱ्या कार चालकाचे नियत्रंण सुटल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी वरील एका युवकाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान अपघाता नंतर कार चालक पळून गेला. त्यास अटक करावी या मागणीसाठी नातेवाईक मित्र परिवाराने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले. पोलीस अधिकाऱयांनी आश्वासन दिल्या नंतर आंदोलनकर्ते शांत झाले.
अपघात प्रकरणी प्रतिक सुरेश चांदारे (वय २१ वर्षे, रा.
सर्वे नं.७८/४ सेंत गजानन महाराज नगर, गजानन मंदीराचे मागे, दिघी) यांनी तक्रार दिली आहे. स्वप्नील प्रदीप खरबडे (वय-26 वर्षे रा.गजानन महाराज नगर सर्व्हे नं. 78 श्री राम कॉलनी क्र.-1 दिघी) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. कार चालक सतीश वाळके ( कार क्र.MH14AD, 4645 चे चालक, रा. दिघी) यांच्या विरुद्ध तक्रार झाली असून अपघाता नंतर कार चालक पळून गेला.
विश्रांतवाडी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जून २०२४ रोजी रात्री अडीच ते साडे तीन वाजता फिर्यादी व मयत स्वप्नील प्रदीप खरबडे हे ॲक्टिव्हा मोपेड (एम.एच.१४ एच.पी. ५२१७) या दुचाकी वरुन येरवडा येथुन राहते घरी दिघी येथे विश्रांतवाडी-आळंदी रोड ने जात असताना आर्मी पब्लिक स्कुल, टी बी २ चे गेट नं.३ चे समोर भरधाव निळ्या रंगाची बलेनो कार रस्त्यावर असलेल्या स्पिड ब्रेकरवरून उडून रस्ता क्रॉस करून ॲक्टीव्हा दुचाकीवर येवुन जोरात धडक देवून फिर्यादी व मयतास खाली घसटत घेवुन जावुन मिलिटरीच्या भिंतीवर जोरात आपटल्याने स्वप्नील खरबडे हे गंभीर जखमी झाले. यामध्ये ते मयत झाले. तर फिर्यादी प्रतीक हा गंभीर जखमी झाला. कार चालकाने वाहन हयगयीने, भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन अपघात करुन स्वप्निल याच्या मत्युस कारणीभत होवुन फिर्यादी प्रतीक यास जबर जखमी केले आहे. अपघात झाले नंतर अपघाताची माहीती न देता पळुन गेल्याने कार चालक सतिश वाळके विरुध्द तक्रार दाखल झाली आहे. कार चालकाचा विश्रांतवाडी पोलिस तपास करत आहेत. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख करत आहेत.