Trending
Video: धानोरी परिसरात तरसाचा वावर
नागरीकांमध्ये भितीचे वातावरण

लोहगाव: धानोरी, लोहगाव परिसरात तरस फिरत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा अखेर खरी ठरली आहे. गुरुवारी (दिनांक ८ फेब्रुवारी) रात्रीच्या पोरवाल रस्त्याजवळील धानोरी हद्दीत असलेल्या एका स्पोर्ट्स अकॅडमी परिसरात तरस दिसला. त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिक्षेत्र वन अधिकारी सुरेश वरक यांच्याशी संपर्क केला असता तरस हा हिंसक प्राणी नाही, त्यामुळे माणसांवर हल्ला करत नाही. तरी देखील नागरिकांनी काळजी घ्यावी असे सांगितले.