वाघोलीतील रामेश्वर शास्त्री प्रासादिक दिंडीचे संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत प्रस्थान

वाघोली : वाघोली येथील रामेश्वर शास्त्री प्रासादिक दिंडीने वाघोलीतून देहूकडे तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत प्रस्थान ठेवले. शुक्रवारी (दि.२८) सकाळी टाळ. मृदुंगाचा गजर व विठ्ठलाच्या जयघोषात देहूकडे तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्याकरिता प्रस्थान झाले.

दरवर्षी होणाऱ्या देहू ते पंढरपूर या पायी वारीमध्ये सहभागी होण्याकरिता व विठुरायाचे दर्शन घेण्याकरिता वाघोलीतील रामेश्वर शास्त्री प्रासादिक दिंडी व शेकडो वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात. तुकाराम महाराजांच्या पालखीमागे मानाचे स्थान रामेश्वर शास्त्री प्रासादिक दिंडीस आहे. वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. सुरुवातीला वाघोलीतील काही वारकरी दिंडी सोबत संत तुकाराम महाराज पालखीत सहभागी झाले असून इतर वाघोलीतील सर्व वारकरी सोलापूर रोड येथून पालखी सोहळ्यात सहभागी होतील.

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button