खुनाच्या गुन्हयातील चार आरोपी दोन तासात अटक
विश्रांतवाडी पोलीसांची कामगिरी
विश्रांतवाडी : पती-पत्नी मधील भाडंण सोडवायला गेलेल्या एकास बेदम मारहाण करुन खून केल्याची घटना धानोरी परीसरात घडली होती. या गुन्ह्यातील चार आरोपींना विश्रांतवाडी पोलीसांनी गुन्हा घडल्या नंतर अवघ्या दोन तासांच्या आतमध्ये अटक केली. विनोद नारायण शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रशांत नारायण शिंदे (वय ४५, रा. माधव नगर, धानोरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अभय विलास शेलार (वय ३३, रा. मुळा रोड, आदर्शनगर), अभिजित विजय यादव (वय ३६), निखिल सुनील गायकवाड (वय ३४, दोघे रा. खडकी), सुमीत विजय यादव (वय ३८, रा. धानोरी गावठाण) असे खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३ मे रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास खुनाची घटना घडली होती. मयत शिंदे हे शेजारी राहणारे शेलार पती-पत्नीची भांडणे सोडवण्यास गेले होते. या कारणावरून त्यांचा मुलगा अभय शेलार व त्याचे अन्य तीन मित्र यांनी प्रशांत यास हाताने व लाथाबुक्याने तोंडावर, पोटावर, पाठीवर, डोक्यात व कानावर जबर मारहाण करुन शिंदे यांचा खून करून पळून गेले. तपास पथकातील अंमलदार दिपक चव्हाण, संपत भोसले, संदिप देवकाते, यांनी त्यांचे बातमीदारामार्फ माहिती काढून दाखल गुन्हयात आरोपी हे मुळा रोड येथे असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड व अंमलदार दिपक चव्हाण, यशवंत किर्वे, संपत भोसले, संदिप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे असे सदर ठिकाणी जावून चारही आरोपींना शिताफिने पकडले.
तपासा दरम्यान आरोपींनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींना ८ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सदरची कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती कांचन जाधव, मोहन खांदारे पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस हवालदार दिपक चव्हाण, बबन वणवे, यशवंत किर्वे, पोलिस नाईक संपत भोसले, संजय बादरे, पोलीस शिपाई संदिप देवकाते, किशोर भुसारे, अक्षय चपटे यांनी केली आहे.