सामाजिक कार्यकर्ते पंकज गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

वाघोली : कोलवडी (ता. हवेली) येथे युवा नेते पंकज गायकवाड पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गावामध्ये विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन पंकज (भाऊ) गायकवाड पाटील युवा मंच व मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त (२८ जून) न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वृक्षांचे वाटप करण्यात येणार असून एकूण तीन हजार वृक्षारोपण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांची मोफत नेत्र व रक्तगट तपासणी केली जाणार आहे. त्याबरोबर विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप केले जाणार आहे. अनाथ आश्रमातील अनाथ मुलांना मोफत साहित्य वाटप व अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बोरमलनाथ गो-शाळेत चारा वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पंकज (भाऊ) युवा मंचच्या वतीने युवा नेते स्वप्नील गायकवाड, विजय गायकवाड यांनी दिली आहे.
गावातील मुरकुटे वस्ती येथील लक्ष्मी गार्डन मंगल कार्यालयात कालवडी गावातील महिला भगिनिंसाठी शुक्रवारी (२८ जून) रोजी सायंकाळी ७ वाजता सिने अभिनेते सचिन सावंत प्रस्तुत खेळ पैठनीचा होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रथम क्रमांकासाठी वॉशिंग मशीन, द्वितीय क्रमांकासाठी एलईडी टिव्ही तर तृतीय क्रमांकासाठी पैठणी, चतुर्थ क्रमांकासाठी सोन्याची नथ, पाचवा क्रमांकासाठी मिक्सर त्याबरोबर कार्यक्रमात सहभागी महिला भगीनिंसाठी आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. महिलांनी होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पंकज भाऊ युवा मंचाच्या वतीने करण्यात आले आहे.