गोरेगाव केंद्रीय प्रा. शाळेत डोळ्यांची तपासणी

गोरेगाव :  पावसाळ्याचे दिवस असल्याने सध्या  डोळे येण्याच्या साथीमुळे  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पर्यायाने विद्यार्थ्यांची दैनंदिन संख्या घटत चालली आहे. यावर आळा घालण्यासाठी तात्काळ उपायोजना व तपासणी करण्यात यावी अशी मागणी गोरेगाव (जि. हिंगोली) येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेच्या शिक्षण समितीने गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे लेखी स्वरूपात निवेदनाद्वारे मागणी केली होती. आरोग्य विभागाने शाळा शिक्षण समितीने दिलेल्या निवेदनाची दखल घेत  जवळपास तीनशे शालेय  विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करून औषध उपचार केले आहे.

आरोग्य विभागाच्या डॉ. ऐश्वर्या शिंदे, डॉ. संतोष गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. महादेव वानखेडे, डॉ. हनुमान सावके, डॉ. किशोर शिंदे, सुवर्णा शेळके, शालीनी मोरे, गणेश चोपडे, शेषराव काकडे यांच्या टीमने डोळ्यांची तपासणी व औषध उपचार केले आहे.

यावेळी मुख्याध्यापक डि ई पवार अशोक कावरखे, नंदकुमार खिल्लारी, रमेश पोफळे, प्रमोद बिल्लारी, शरिफ घनकर, बेडके, काळे, सुरेश हनवते, रामचंद्र वैरागड, पतंगे, पोपुलवार यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप कावरखे, उपाध्यक्ष सय्यद सलीम सय्यद लाल, वर्धमान साळवे यांची उपस्थिती होती.

‌» घाबरण्याचे कारण नाही, काळजी घ्यावी 

डोळ्याच्या साथीचा प्रभाव सर्वांत जास्त शाळकरी मुलामुलींमध्ये दिसत आहे. पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. स्वच्छता, नियमित हात धुणे, डोळ्याला सारखे हात लावणे टाळणे, एकमेकांचा रूमाल किंवा टॉवेल न वापरणे आदी बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा असे आवाहन गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकारी ऐश्वर्या शिंदे यांनी केले आहे.

Download in JPEG format

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button