पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम देण्याची मागणी

आमदार अतुल बेनके यांचे पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन

पुणे : पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक देण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार अतुल बेनके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक देणे हा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. ९ हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे. अनेक कर्मचारी हे ग्रामीण भागातून नोकरीच्या निमित्ताने शहरात आलेले आहेत. पीएमपीएमएलचा कर्मचारी हा अत्यावश्यक सेवेत येत असून उण, वारा, पाऊस याची तमा न बाळगता सेवा करत आहे. सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळण्याची अपेक्षा अनेक वर्षांपासून कर्मचारी करत आहे. शाळा चालू झाल्याने अनेक कर्मचारी यांना आपल्या पाल्यांची शाळा फी भरण्यासाठी पैशाची गरज असते. सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळावी म्हणून कर्मचारी सातत्याने मागणी करत असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले आहे.

तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडेही पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम लवकर मिळण्याची मागणी आमदार अतुल बेनके यांनी केली आहे.

पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम लवकर मिळण्यासाठी पुणे महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त व अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ यांना आदेश द्यावेत अशी मागणीही आमदार अतुल बेनके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button