शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अॅॅड. वसंतराव कोरेकर यांची बिनविरोध निवड
सभापतीपदासाठी इच्छुकांची होती रस्सीखेच सुरू

- माजी सभापती व संचालक शशिकांत दसगुडे यांनी त्यांच्या कार्यकाळात तोट्यात असलेली शिरूर कृषी उत्पन्न बाजर समिती सुस्थितीत आणली तर त्यानंतर माजी सभापती शंकर जांभळकर यांनी अडीच कोटी रूपये शिल्लकीत आणून त्यावर कळस चढवण्याचे काम केले असून भविष्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, बाजार समिती इमारतीचे कामे यांसह इतर विकासाची कामे होणार आहे. यांसारख्या विकास कामांची घोडदौड यापुढेही मोठ्या अनुभवानुसार नवनियुक्त सभापती अॅड. वसंतराव कोरेकर करतील असा विश्वास आमदार अॅड. अशोक पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
शिरूर : शिरूर बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असुन ठरल्याप्रमाणे शंकर जांभळकर यांनी राजीनामा दिल्याने सभापतीपद रिक्त झाल्यापासुन सभापतीपदासाठी इच्छुक राष्ट्रवादीच्या संचालकांमध्ये रस्सीखेच सुरू होती. दरम्यान बाजार समितीच्या सभागृहात शनिवार दि.१० रोजी विषेश सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अॅॅड. वसंतराव कोरेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक शंकर कुंभार यांनी जाहिर केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठत्वानुसार अॅॅड. वसंत कोरेकर यांची सभापतीपदावर सर्वानुमते बिनविरेाध निवड करण्यात आली असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, तालुकाध्यक्ष रविबापु काळे, शिरूर आंबेगावचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे, खरेदी विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे, शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, युवकचे तालुकाध्यक्ष सागरराजे निंबाळकर, शहराध्यक्ष रंजन झांबरे, महिला तालुकाध्यक्षा विद्याताई भुजबळ, शहराध्यक्षा पल्लवी शहा, युवती तालुकाध्यक्षा संगीता शेवाळे, लीगल सेलचे तालुकाध्यक्ष अॅॅड. प्रदिप बारवकर, शहराध्यक्ष अॅॅड. रविंद्र खांडरे आदिंसह सर्व संचालक उपस्थित होते.
सभापतीपदी अॅॅड. वसंतराव कोरेकर यांची निवड झाल्यानंतर शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परीषद सदस्या सुजाता पवार, जिल्हा परीषद सदस्य राजेंद्र जगदाळे, तालुकाध्यक्ष रविंद्र काळे, शिरूर आंबेगावचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी नवनिर्वाचित सभापती कोरेकर यांचा पुष्पगुच्छ देवुन सन्मान केला.