Video : कल्याणीनगर येथे आलिशान कारने दोघांना चिरडले

अल्पवयीन कार चालकास येरवडा पोलीसांनी घेतले ताब्यात

पुणे :  पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने भरधाव वेगाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने कार चालवून दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण-तरुणीचा अपघातात मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याणीनगर येथे घडला. याप्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन कार चालक मुलाविरुद्ध मोटार वाहन अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

अनिस अवधिया, अश्विनी कोष्टा असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुण-तरुणीचे नाव आहे. अकिब रमजान मुल्ला (वय २४, सद्या रा. चंदननगर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचे राजस्थानचे असलेले तरुण-तरुणी हे दोघेही त्यांच्या बजाज पल्सर (एमएच १४, सी क्यू ३६२२) या दुचाकीवरून कल्याणीनगर कडून येरवड्याकडे मित्रांसह घरी जात होते. कल्याणी नगर एअरपोर्ट रस्त्यावरील लँडमार्क सोसायटी जवळ ग्रे कलरच्या दोन्ही बाजूस नंबर प्लेट नसलेल्या पोर्शे कार चालकाने चारचाकी गाडी हयगयीने,  निष्काळजीपणाने, भरधाव वेगाने, बेदरकरपणे तसेच मानवी जिवितास हानी पोहोचेल अशा स्थितीत चालवून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून पल्सर दुचाकी ला पाठीमागून धडक दिली.   यामध्येच दुचाकी वरील दोघा तरुण-तरूणीचा मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार अपघात करणारी मोटर कार प्रचंड वेगात होती. या भागातील एका पबमध्ये पार्टी झाल्यानंतर हा तरुण, तरूणी आणि त्यांचे मित्र मैत्रिणी पार्टी करून अडीचच्या सुमारास बाहेर पडले. त्यावेळी भरधाव कारची धडक बसल्याने अपघात घडला. या अपघातात तरुणी  जागीच मृत्युमुखी पडली तर जखमी तरुणाचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. स्थानिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले. पोलिसांना घटनेची माहिती कळवण्यात आली. या अपघाताचे व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला असून कार चालकास जमाव मारहाण करत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर त्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अपघात प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी करत आहेत.

पोलीस आयुक्तांच्या आदेशाला तिलांजली : 

कल्याणीनगर, विमाननगर परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरू असणारे हॉटेल व पब यामध्ये मोठ्याप्रमाणावर तरुण तरुणी येत असतात. उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या आस्थापनांवर कारवाईचा आदेश पोलीस आयुक्तांनी दिलेले आहेत. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत नाही. त्यामुळे अशाप्रकारे भीषण अपघात घडत आहेत.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button