Video: शाबासकीची थाप बळ देणारी – अनिल सातव पाटील
नितीन गडकरी यांचेकडून अनिल सातव यांच्या कामाचे कौतुक
वाघोली : वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी वाघोली येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आले होते. सभेदरम्यान भाजप युवा मोर्चा हवेली तालुकाध्यक्ष अनिल सातव यांच्या कामाचे कौतुक करून सातव यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
वाघोली येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाघोलीतील केसनंद फाटा येथे शनिवारी (दि. ११ मे) सभेसाठी उपस्थिती लावली होती. सभा सुरु होण्यापूर्वी गडकरी यांचेसह भाजप, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. दरम्यान भाजपा युवा मोर्चा हवेली तालुकाध्यक्ष अनिल सातव पाटील व भाजपा वाघोली शहर अध्यक्ष केतन जाधव यांनी गडकरी यांना वाघोली गावाच्या विविध समस्या सोडवण्याबाबत लेखी निवेदन दिले. सातव यांनी दिलेल्या निवेदनाचे गडकरी निरीक्षण करत असताना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अनिल सातव प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता असल्याचे सांगितले. यावेळी गडकरी यांनी अनिल सातव पाटील यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत नागपूर येथे येवून भेटण्यास सांगितले. गडकरी यांनी पाठीवर दिलेली शाबासकीची थाप ही बळ देणारी असल्याची भावना सातव पाटील यांनी व्यक्त केली.