वाघोलीत ६० हजार ६९४ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

एकूण ५९ मतदान केंद्र; वाढलेले नवीन मतदार २३०५१; २४ नवीन मतदान केंद्रात वाढ

वाघोली : शिरूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी (१३ मे) होणाऱ्या मतदानामध्ये वाघोलीतील ६०६९४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ३३ हजार ८१६ पुरुष व 26 हजार ८७२ महिला तर सहा तृतीयपंथी मतदार आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीमध्ये ३७ हजार ६४३ मतदार होते. साडेचार वर्षात ऑनलाईन मतदार व नोंदणी अभियानात २३ हजार ५१ नवीन मतदार वाघोलीच्या मतदार यादीत जोडले गेले आहेत. त्याचबरोबर २४ मतदान केंद्रामध्ये वाढ झाली असून एकूण ५९ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. शिरूर लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदारसंघ असणाऱ्या वाघोली गावामध्ये ६० हजार ६९४  मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्यामुळे निवडणुकीत उमेदवारांचे वाघोलीवर विशेष लक्ष असणार आहे. ऑनलाईन मतदार नोंदणी अभियानात साडेचार वर्षांमध्ये २३ हजार ५१ नवीन मतदार वाढले आहेत. वाघोलीतील सोमवारी (१३ मे) होणाऱ्या मतदानासाठी मतदान शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून जवळपास ४५० कर्मचारी यासाठी कार्यरत राहणार आहेत. वाघोलीत मतदान प्रक्रिया सातव हायस्कूल जिल्हा परिषद शाळा या दोनच ठिकाणी पार पडली जात होती. परंतु या निवडणुकीत मतदान केंद्राची संख्या वाढवण्यात आली आहे सातव हायस्कूल वाघोली, जिल्हा परिषद शाळेसह बीजेएस कॉलेज, सातव जुनिअर कॉलेज अंगणवाड्या, उबाळेनगर जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा काम करीत आहे.

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button