चोरट्यांनी दागिन्यांसह रोख रक्कमेवर मारला डल्ला

उघड्या ठेवलेल्या खिडकीतून केला प्रवेश

वाघोली :  गरम होत असल्याने घराची खिडकी अर्धवट उघडी ठेवल्याने खिडकीतून कशाच्यातरी सहाय्याने दरवाजा उघडून घरातील कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना कोलवडी येथील श्री संत रोहिदास नगर येथे घडली. तर दुसऱ्या प्रकरणात दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीच्या उघडया दरवाजावाटे प्रवेश करून बॅगमध्ये ठेवलेले दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना वाघोली येथील गेरा वल्र्ड ऑफ जॉय सोसायटीत घडली. दोन्ही प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाघोली येथील गेरा सोसायटीच्या फ्लॅटमधील पती पत्नी सायंकाळी उशिरा क्लब हाऊसमध्ये बॅडमिंटन खेळण्यासाठी गेल्यानंतर चोरटयाने त्यांच्या फ्लॅटच्या गॅलरीच्या उघडया दरवाजावाटे प्रवेश करून बॅगमध्ये ठेवलेले ७.२ तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरटयांनी लंपास केले. पती पत्नी घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी धीरेंद्र देवडा यांनी फिर्याद दिली आहे. कोलवडी येथील घटनेमध्ये गरम जास्त होत असल्याने हॉलमधील खिडकी अर्धवट उघडी ठेवून घरातील कुटुंबीय झोपी गेले होते. मध्यरात्री घरातील महिलेला जाग आल्यानंतर हॉलचा दरवाजा उघडा व हॉलमधील साहित्य अस्तव्यस्त झालेले दिसले. घरातील साहित्य तपासले असता कपाटात ठेवलेले ३.५ तोळ्याचे दागिने, पैंजण व रोख २२ हजार चोरट्यांनी चोरून नेले होते. खिडकीतून कशाच्यातरी सहाय्याने दरवाजा उघडून चोरी केल्याप्रकरणी अशोक गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button